Let me start with shedding light on the fact that the substaintiality of our community is real & present in all parts of India as well as abroad. While coming from Gujarat, our ancestors with a long-sighted vision, set up Gujar community on the banks of holy rivers like Tapi-Narmada-Gomai.
In order to give the society the right direction, deserved education, economic progress, Late National President Annasaheb P.K. Patil put immesne efforts & sacrificed his life towards the betterment. He was inclined towards the eradication of the undesirable customs in the society.
In order to ensure the farmers walk on a path to progress, every girl & boy gets quality education, Satpuda Sugar Factory Sutagirani – Starch Factory – Paper Mill Plyboard and various such projects were set up in various industrial areas.
मित्रहो आपला समाज हा भारताच्या चोही दिशेला व परदेशात सुध्दा वास्तव्यात आहे . आपले पुर्वजांनी गुजरात राज्यातून येताना फार दुरदृष्टी ने तापी – नर्मदा – गोमाई सारख्या पवित्र नदीचा काठी गुजर समाजाचे वास्तव्य केलं .
समाजाला चांगली दिशा मिळावी समाज शिक्षीत व्हावा समाजाची आर्थिक प्रगती व्हावी , समाजामध्ये असलेल्या अनिष्ट चालीरितींचा नायनाट व्हावा , मुला – मुलींना चांगले शिक्षण मिळावं या दुरदृष्टीचा विचार करुन समाज भूषण गुजर समाजाचे चे राष्ट्रीय अध्यक्ष कै . अण्णासाहेब पी के . पाटील यांनी जीवाचे रान केले . माझ्या परिसराचे शेतकरी कसा प्रगतीपथावर जाईल मुलां मुलींना चांगले शिक्षण कसे मिळेल या दूरदृष्टीचा विचार करुन सहकार तत्वावर सातपुडा साखर कारखाना सुतगिरणी – स्टार्च फॅक्टरी – पेपरमील प्लायबोर्ड असे विविध उद्योग परिसरात उभे केले .
शिक्षणाची चिंता करत करत पूज्य साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमाने गोमाईच्या काठी इंजिनिअरींग – बी फार्म – शेतकरी कॉलेज ज्युनिअर कॉलेज सर्व शिक्षणाची सोय त्यांनी समाजासाठी केली , म्हणून गोर गरीबांची मुले देखील उच शिक्षण घेऊन भारतात व परदेशात उच्च पद भुषवित आहेत . ते फक्त कै . अण्णासाहेब यांच्यामुळे गुजर समाजाला दिशा दाखवण्याचा मोहिमेमध्ये अण्णा साहेब सोबत समाजाचे उपाध्यक्ष राहिलेले कै मोहनभाई चौधरी ( कलसाडी ) , कै . श्रीपतभाई पटेल ( निझर ) , कै सुदाम रघुनाथ पटेल ( वेलदा ) , कै . संभूसर ( प्रकाशा ) , कै . यशवंत पी . पटेल ( वेलदा ) स्व . मदन लीमजी पटेल ( सागबारा ) आदरणीय कमलताई पाटील ( विद्या विहार ) तुकाराम रामदास पाटील ( पिंगाणे ) असे समाजाचे थोर पुरुषांनी समाजाच्या सुधारणेसाठी अहोरात्र मेहनत घेतली . जीवनाचा अखेरच्या क्षणापर्यंत समाजकार्य करीत राहिले . या समाजपुरुषांना मानाचा मुजरा .
भुतकाळामध्ये आपल्या समाजामध्ये हुंडा पध्दत अनेक अनिष्ट चालीरिती होत्या , त्यामुळे समाज आर्थिकदृष्ट्या मागे होत होता हे सर्व बाबींचा विचार करून आखिल भारतीय गुजर समाजाने समाजासाठी एक नियमावली तयार केली व त्या नियमाचे पालन करण्याचे समस्त गुजर समाजाला आवाहन करून त्यामुळे हुंडा पध्दत व लग्न कार्याच्या विविध अनिष्ट चालीरितींना बंद केले . मंदिरात किंवा साध्या पध्दतीने समाजाने लग्न करावे असे प्रयत्न अण्णासाहेबांनी समाजासाठी केले आणि आज त्यांच्या या समाज प्रगतीचे फळ आपण सर्व पाहत आहोत . एवढ्या मोठ्या समाजाला एकत्र करणे समाजाला संगठित करणे ही काही लहान बाब नाही . समाजकार्य करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते पण असे अनेक अडचणीत मार्ग काढत कै . अण्णासाहेबांनी समाजकार्य अविरत चालू ठेवले . त्यांचं ब्रिदवाक्य होते , ” थांबला तो संपला ” हे ब्रिदवाक्य सिध्द करण्यासाठी न थांबता समोर असलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करून समाजाला एक चांगली दिशा दाखवली .
आपले आदर्श कै . अण्णासाहेबांनी समाजासाठी घडवून आणलेले नियमावलीचे आजसुध्दा कित्येक समाज बंधु भगिनींना माहित नाही काय काय नियम केले आहेत . मी या माध्यमाने केदारेश्वर प्रतिष्ठाण पुणे व सर्व संचालक मंडळाला विनंती करतो . की पुणेचा सन २०१ ९ च्या प्रसिध्द होणाऱ्या ” गुजरमित्र ” या सामाजिक पुस्तकमध्ये समाजाची नियमावली प्रसिध्दी केली तर ते समाजाचे एक उत्तम कार्य होईल . समाजाची प्रगती वाढावी समाजातल्या मुला – मुलींना उद्योग व रोजगाराचे मार्गदर्शन व्हावे या हेतूने समाजासाठी पुढे सरसावले ते विविध ग्राम – ग्लोबल गुजर मंडळ ( VSGGM ) सोशल मिडीयाचे माध्यमाने विविध शहरामध्ये असणारे समाज बंधुना एकत्र आणून समाजासाठी विविध उपक्रम राबवून समाजाला संघटित करण्याचे काम ( VSGGM ) करत आहे खरचं अभिनंदनीय आहे . कै . अण्णासाहेबांचे स्वप्न होते की , गुजर समाजामध्ये ही सामुहिक विवाह व्हावे परंतु त्यांची ही अपेक्षा त्यांच्या देखत पूर्ण झाली नाही . दिनांक १६ एप्रिल २०१७ ला VSGGM ने गुजर समाजाचे ९ जोडप्याचे पहिला सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला व कै . अण्णा साहेबांचे स्वप्न पूर्ण केले . VSGGM च्या माध्यमाने मेडीकल कॅम्प – वृक्षारोपण समाजाचे भूषण असणारे भजन – गवळण – रास यासारखे सामाजिक प्रबोधनाचे कार्य हाती घेऊन भजन – रास स्पर्धा घेऊन नवयुवा पिढीला सोशल मिडीयाच्या युगात अध्यात्माकडे वळविण्याचे काम भजन स्पर्धेने केले .
समाजामध्ये सरकारी निम – सरकारी उद्योजक म्हणून जे समाज बांधव आहेत त्यांनी सुध्दा समाजाचे ऋण फेडण्यासाठी समाजाचे शिक्षीत युवकांना नोकरी – व्यवसायासाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून गुजर चेम्बर्स ऑफ कॉमर्सची स्थापना केली . त्यांची नोंद सरकार दरबारी करण्यात आली . GCCA गुजर चेम्बर्स ऑफ कॉमर्सच्या सौजन्याने VSGGM ने शहादा येथे उद्योग एक्सप्रो प्रदर्शनी ३ दिवस आयोजित केली . त्यात शेती पुरक उद्योग , आधुनिक शेती व व्यवसाय , रोजगार या बाबत तज्ञ जेष्ठांचे मार्गदर्शन मिळाले व समाजातील तरुणांनी उद्योगाकडे वळावे असे मार्गदर्शन केले . VSGGM सोबत गुजर समाजमंच ची स्थापना झाली . या गुजर मंचाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष श्री . दिपक बापू यांच्या परवानगीने निझर येथे सामुदायिक विवाहाचे नियोजन केले . दि . १८/२/२०१८ रोजी सर्व समाज मान्यवर यांच्या उपस्थितीत २३ जोडप्यांचे समुह विवाह संपन्न झाले आणि समाजाचे नावलौकिक केले . समाजाचे शिक्षीत बेकार तरुणासाठी सेलवास येथे HR मॅनेजर असलेले गुजर सुपुत्र श्री . भरतभाई मुरार पटेल यांच्या प्रयत्नाने गुजर समाज मंच द्वारा निझर येथे रोजगार भरती मेळाव्याचे नियोजन करुन ४५० मुलांचा इंटरव्ह्यु घेण्यात आले . व २३२ मुलांना रोजगार नोकरी उपलब्ध करुन दिली . ते सुध्दा समाजासाठी ऐतिहासिक काम झाले आहे . VSGGM / गुजर समाजमंच हे दोघे मंडळ वेगळे नसून त्यांचे कार्य समाजकार्यच आहे . समाज अध्यक्ष वाटचाल करीत आहे ही गौरवाची बाब आहे .
समाजाचे सामुहिक विवाह असो , भजन असो जलसंधारण असो आपला समाज बंधुच्या प्रत्येक कार्याला आर्थिक व शारीरिक मदत करण्यासाठी सदैव अग्रेसर असतो ही अभिमानाची बाब आहे . या मदतीशिवाय समाजकार्य शक्य नाही . असे सर्व समाजबंधुना नमन करतो .
सामुदाईक विवाह ही काळाची गरज आहे . आपला समाज मोठे कार्य करतो आणि देखा – देखी मध्ये चढाओढ करुन त्यामुळे आर्थिक अडचण उभी राहते . कै . अण्णासाहेबांचे स्वप्न होते सामुहिक विवाह झाले पाहिजे . आत समाजामध्ये ३ टप्प्यात एकूण ६५ जोडप्यांचे विवाह झाले . परंतु समुह विवाहाला चालना देण्यासाठी उच्च शिक्षीत व मोठे लोकांनी जर यात भाग नोंदवला तर पुढे या समाजाचे सर्व विवाह सामुहिक विवाहामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही . आपली सामुहिक विवाहाबाबतची मानसिकता बदलावी लागेल . VSGGM व गुजर समाजमंचच्या वतीने मनरद व प्रकाशा येथे सामुहिक विवाह होणार आहे . त्या समुह विवाहामध्ये जास्तीत जास्त जोडपे सहभागी व्हावे असा प्रयत्न आपण सर्व समाज बंधु कडून करावे अशी अपेक्षा .
केदारेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमाने क्रिकेट स्पर्धा वृक्षारोपण , रक्तदान शिबीर सिंहस्थ पर्वणीसाठी कार्यक्रमाचे नियोजन करुन व सामाजिक बांधिलकी असलेले गुजर समाजाचे फिल्म कलाकार नितीनभाई पाटील बामखेडेकर यांनी सादर केलेली समाज उपयोगी नाटक ” घेर घेरनी वात ” हे नाटक समाजासाठी मार्गदर्शनीय ठरले आहे . असे प्रयोग सोशल मिडिया पुरते मर्यादित न ठेवता समाजापुढे सादर करुन समाजाला एक चांगली दिशा मिळेल . नितीनभाई व कलाकारांचे अभिनंदन ! आजचा केदारेश्वर प्रतिष्ठानच्या स्नेह मिलन सोहळा ला व ‘ गुजर मित्र ‘ अंकाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा !
Mr. Jagdishbhai Raghunathbhai Patel
Mahamantri Tapi District Co. Committee