Gems Chamber of Commerce Association Logo | GCCA

VSGGM मित्रा खरा किसान पुत्र तू !

Indian Farmer- GCCA

शेतीप्रधान देशातला शेतीप्रधान समाज . निसर्गाच्या सानिध्यात सर्वस्वी निसर्गावर अवलंबून शेतकऱ्यांचे जीवन सुमारे साडे आठशे वर्षांचा इतिहास . साडेसात शतके तर संपूर्णतः शेताच्या बांधावर सिमीतच . या कष्टप्रद साडेसातीतून समाजाला बाहेर काढले असेल तर आण्णासाहेब , कै . विश्रामकाका , पाटीलवाडीकर कै . नादरखेडेकर , कै . फकीरा काका या आणि त्यांचे सहकारी थोर विभूती यांनी या आणि त्यांच्या असंख्य सहयोगी योगींना शत शत नमन आहे . या मान्यवरांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक संस्था तसेच सहकारी प्रकल्प निर्माण होत समाजाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढत समाज मोठ्या दिमाखाने उभारी धरु लागला हेच समाजासाठी शापाला कारणीभूत ठरू लागले . राज्यस्तरावरील राजकारणाच्या काळजाला धडकी भरू लागली . ऐन केन प्रकारे समाजाच्या ऐक्यात दुफळी माजवून आपापला स्वार्थ साधला जाऊ लागला . यामुळे झाले हे की समाजाचा आर्थिक विकासाबरोबरच शैक्षणिक विकास साधता साधता ग्रामीण स्तरावर केवळ ” विरोधा करता विरोध ” चे बीजारोपन होते गेले . यामुळेच जो तो व्यक्तीश : सबळ तर होऊ लागला पण समाजातील ऐक्यावरील पकड सैल होऊ लागली . जो तो ज्याच्या त्याच्या तोऱ्यात स्वतःला मिरवू लागला . कुणी कुणाचे ऐकूण घेण्याच्या मनस्थिती शिवाय जगू लागला . मग कुठे कुणाला वेळ होता समाजाकडे पाहायला ?

२० व्या शतकाच्या दशकात जसे आण्णासाहेबांच्या सहकार प्रकल्पांनी समाजाला तारले तसेच २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकापासून VSGGM च्या तरुणाईने समाजाला तारले असे म्हणणे वावगे ठरणार नाही हे नक्कीच . सामाजिक विकासात मोठा अडसर ठरणारा लग्नाचा बडेजावी खर्च टाळण्यासाठी सामुहिक विवाह सोहळा उपक्रम तर राबविलाच पण शेतीनिष्ठ समाजासाठी पुरक ठरणाऱ्या पुढील बाबींवर विशेष भर देण्यात आला .

  1. झाडे लावा झाडे जगवा .
  2. पाणी आडवा पाणी जीरवा .
  3. झाडांच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळींचा विवाह सोहळ्यात वापर .
  4. सामुहिक विवाह सोहळ्यात सुमारे दहा ते वीस हजार लोकांच्या जेवणावळीच्या पत्रावळी , उष्ट , कचरा वगैरे इतरत्र न फेकता त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती
  5. ईको फ्रेंडली गणपतीची स्थापना .
  6. शेतकऱ्यांच्या जीवनात अत्यंत त्रासाचे ठरलेले गाजर गवताचे निर्मुलन
  7. शेतकऱ्याच्या उच्चविद्याविभूषित बेरोजगार मुलाना GCCA च्या माध्यमातून व्यवसायासाठी मार्गदर्शन आणि मदत . या आणि अशा अनेक मार्गांनी VSGGM शेतकरी जीवनाच्या काळजाला हात घातला आहे . शेतकरी बांधवांच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त केलेले आहे . म्हणूनच आज • शेतकरी बांधवांच्या मुखातून एकच आवाज येतोय ” VSGGM मित्रा खरा किसान पुत्र तू !

आदरणीय VSGGM

स.न.वि.वि.
कधी मामाभाच्याचे नाते कधी साले मेहुण्याचे नाते कधी हसी मजाकमधे अनेक लहानमोठे विषय सहजलिलयेतून विचारमंथन करीत त्यास सामाजिक रुप देत सर्वांच्या महान योगदानातून भव्यदिव्य असे ऐतिहासिक उपक्रम संपन्न करण्याची आपली किमया वंदनीय आहे . समाजाच्या अनेक सामाजिक चढउतारात VSGGM स्थान काळाची गरज ठरली आहे ती केवळ या पवित्र शृंखलेत जोडले गेलेले तमाम तरुण समाज बांधवांमुळे . सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण कुणाला द्यायचे असले तर VSGGM चे नाव अग्रस्थानी राहील हे निर्विवाद सत्य आहे . VSGGM ची प्रत्येक कड़ी आपापल्या दैदिप्यमान जीवनातील नैपुण्यतेची मुर्तीच तरी असे आपले अस्तित्व बाजूला ठेवून ” मी मी नव्हे , मी तर VSGGM ” म्हणत या शृंखलेत जोडले गेले आहेत . अशी ही पवित्र शृंखला अविरत चालण्यासाठी तरुणाईचा हा सहभाग वंदनीय आहे यात माझा सहभाग खारीचा वाटा जसा रामसेतूकेत

एवढे मोठे महद् कार्य होत असताना आपल्या मुळे काही कळत न कळत मत प्रदर्शन होणे , न होणे , प्रत्यक्ष कृतीत राहणे , न राहणे सहभाग संख्यांची अडचण इ . असे अनेकविध अडचणी असू शकतात . यास्तव जर काही सदस्य संख्या कमी करण्याचा मानस असेल , कुणाला Add & Removed चा प्रश्न उद्भवत असेल तर कृपया निसंकोचपणे मला विश्रांती रुपी भेटीने Removed करण्यात प्रथम प्राधान्य द्यावे ही विनंती आहे . VSGGM हे पवित्र सामाजिक बंधन निरंतर चालत आहे , चालणार आहे . सृजनशिल समाजाच्या हृदयात एक चैतन्य म्हणून कायम राहणार आहे , हे एक निर्विवाद सत्य आहे . या पवित्र्यात किंचितसाही आपला आळस , आपली कमतरता , आपला अहं , आपला हट्ट , आपले वेगळेपण अडसर ठरू नये यास्तव माझा मानस VSGGM नक्कीच समजून घेईल हीच माता अन्नपुर्णा चरणी प्रार्थना.

श्री . जगन्नाथ भाऊभाई चौधरी
नंदुरबार , न्यु बामखेडेकर

GCCA drives community business growth & innovation. Join the network of community leaders sharing their wisdom & experience.

Explore

Support

We help ambitious minds to take a leap towards their goals with apt guidance and sustained success.

All rights reserved with GCCA. Copyright © 2024